…तर शिक्षकांना राजीनामा द्यावा लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र

औरंगाबाद: खडतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. परिश्रम, सखोल अभ्यास, नियोजन आणि कुशाग्र बुध्दीच्या जोरावर परीक्षा पास झालेल्या भावी गुरुजींना प्रमाणपत्राची सहा महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर आता सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

सेवेत राहण्यासाठी TET अनिवार्य

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे की, सेवेत राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी TET परीक्षा देणे आणि उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह अनेक राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला आहे.

TET परीक्षेचे महत्त्व

२०१० मध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (NCTE) इयत्ता १ ते ८ वीपर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्तीसाठी किमान शैक्षणिक पात्रतेचा नियम केला. त्यानंतरच TET परीक्षा सुरू करण्यात आली. या परीक्षेत उत्तीर्ण होणे हे शिक्षकांसाठी आवश्यक ठरले.

पाच वर्षे उरलेल्या शिक्षकांना सूट

न्यायालयाने म्हटले आहे की, ज्या शिक्षकांना निवृत्त होण्यासाठी फक्त 5 वर्षे उरली आहेत, त्यांना परीक्षा न देता सेवा पूर्ण करता येईल.

पण ज्यांच्याकडे 5 वर्षांपेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे, त्यांनी TET पास करणे अनिवार्य आहे.

अन्यथा राजीनामा द्यावा लागणार

ज्या शिक्षकांना TET परीक्षा पास करणे शक्य होणार नाही, त्यांना दोनच पर्याय राहतील.

राजीनामा देणे 

सक्तीची निवृत्ती स्वीकारणे आणि फायदे घेणे