संभाजीनगर: केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाची मुदत संपत आल्याने, आठवा वेतन आयोग लवकरच लागू होण्याची चर्चा सध्या जोमात आहे.
काय असेल बदल
सध्याचे किमान वेतन ₹१८,००० आहे
नवीन वेतन ₹२६,००० पर्यंत होऊ शकते
पगारात थेट ४० ते ५०% पर्यंत वाढ अपेक्षित
Qफिटमेंट फॅक्टर २.२८ ते २.८६ दरम्यान राहण्याची शक्यता
फिटमेंट फॅक्टर म्हणजे नेमकं काय
जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे यावर एक ठराविक गुणोत्तर लावून
नवीन वेतन ठरवले जाते.
उदा. जर तुमचा मूळ पगार ₹१०,००० असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.५७ असेल
नवीन पगार = ₹२५,७०० होतो.
आतापर्यंतचे वेतन आयोग व फिटमेंट फॅक्टर
वा आयोग – १.८६
वा आयोग – २.५७
वा आयोग – २.८६ (अपेक्षित)
कधी होईल अंमलबजावणी
यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा नाही, मात्र *कर्मचारी वर्ग उत्सुकतेने वाट पाहत आहे.