विनापरवानगी फोटो, शूटिंग करणाऱ्यांना होणार २ हजारांचा दंड..

महाराष्ट्र

औरंगाबाद: डाॅ. बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठ परिसराच्या सुरक्षेसंदर्भात सात सदस्सीय बैठक पार पडली. यात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात असून ते खालीलप्रमाणे आहेत…

प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी फोटो, व्हिडीओ शूटिंग केल्यास २ हजार रु. दंड

विद्यापीठ परिसरात वाहन शिकवण्यासाठी दुचाकी, चारचाकी आढळून आल्यास ३ हजार रुपये दंड आकारला जाणार.

प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलनास पूर्वपरवानगी लागेल.

उपोषण, मोर्चे आंदोलनाला पोलिसांची परवानगी बंधनकारक राहील.

कुलगुरू कार्यालयात आंदोलकांना परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही,

वाहनांची वेगमर्यादा २० किमी प्रति तास राहील याकडे लक्ष देणे

हाॅर्न प्रतिबंध, धूम्रपानावर बंदी पालनाकडे लक्ष देणे, फलक लावणे

अनुचित प्रकार, दुर्घटना, मदतीवेळी संपर्कासाठी सुरक्षा रक्षकांचा संपर्क क्रमांक फलक लावणे

स्नेक कॅचरची व्यवस्था व सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक दर्शनी ठिकाणी लावणे

कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सुरक्षारक्षकांना बायोमॅट्रिक हजेरी, ड्रेसकोड, ओळखपत्र बंधनकारक

सकाळी ६ ते ९ पायी चालणाऱ्यांच्या सुरक्षेसाठी वाहनांना विद्यापीठ गेटवर डाव्या बाजूने वाहनतळ करणे.

परिसरातील फुले तोडण्यास सक्त मनाई राहील.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त.

विद्यापीठ प्रवेशद्वारापासून ते विधी विभागापर्यंत मुख्य रस्त्यावर गरजेनुसार गतिरोधक,

बारा ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था..