औरंगाबाद-अहमदनगर-पुणे महामार्गात ‘ह्या’ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार…

महाराष्ट्र

औरंगाबाद: National Highways Authority of India (NHAI) द्वारे 225 किमी पुणे-अहमदनगर-औरंगाबाद द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्रातील पैठण आणि अहमदनगर प्रदेशांमधून मार्ग संरेखित असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. याला संभाजीनगर -पुणे द्रुतगती मार्ग असेही म्हणतात.

या मार्गामुळे औरंगाबाद ते पुणे हे अंतर सव्वादोन तासांत पार होईल, असा मार्ग नव्याने बांधण्याची घोषणा एप्रिल २०२२ मध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.त्यासाठी भूसंपादनाची अधिसूचना ३ (ए) निघाली असून, औरंगाबाद तालुक्यातील ७, तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून या महामार्गासाठी भूसंपादन करावे लागणार आहे. या महामार्गासाठी तीन जिल्ह्यांत यासाठी भूसंपादन करावे लागणार असून, पहिल्या टप्प्यातील पुण्याकडून भूसंपादन होणार आहे. अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यांतून हा मार्ग जाणार असून, या जिल्ह्यांतील भूसंपादनाची जबाबदारी कॉम्पिटेंट ॲथॉरिटी फॉर लॅण्ड ॲक्वायजेशन उपजिल्हाधिकाऱ्यांवर असेल.

ह्या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार…

औरंगाबाद तालुक्यातील पीरवाडी, हिरापूर, सुंदरवाडी, झाल्टा, आडगाव बुद्रुक, चिंचोली, घारदोन तर पैठण तालुक्यातील वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूसवाडी, वडाळा, बवा, वरुडी बुद्रक, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखतवाडा, वाघाडी, दडेगाव जहाँगीर, पोटगाव, सायगाव, पैठण परिसरातील भूसंपादन करावे लागणार आहे.