धनतेरस किंवा धनत्रयोदशी का साजरी केली जाते 

महाराष्ट्र

या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांची खरेदी करतात (लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुख्यतः धनाची आणि कुबेराची पूजा केली जाते)

आपण धनत्रयोदशी हा सण साजरा करण्यामागे काय कारण आहे.. निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहो यासाठी देवाची आराधना तर या दिवशी भक्त मनोभावे पूजा तर करतात परंतू पूजेसह काही सोपे कामं केले तर धनासंबंधी अडचणी दूर करता येऊ शकतात. कारण या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या १३ पटीने लाभ होतो असेही म्हणतात.

आजचा राहुकाळ – दुपारी :- ०३.०० ते ४.३० वाजे पर्यंत.