महिलांना 90% अनुदानावर मिळणार पिठाची गिरणी! सुरू करा स्वतःचा व्यवसाय

महाराष्ट्र

औरंगाबाद: महाराष्ट्र सरकार अनुसूचित जाती व जमातीतील महिलांना पिठाची गिरणी खरेदीसाठी 90% अनुदान देत आहे. या योजनेमुळे महिलांना कमी भांडवलात स्वतःचा रोजगार सुरू करता येतो

पिठाची गिरणी व्यवसायाचे फायदे

कमी गुंतवणुकीत जास्त नफा

ग्रामीण भागात कायम मागणी

वर्षभर चालणारा व्यवसाय

पात्रता निकष

अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.

अर्जदार महिलेचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे.

महिला अनुसूचित जाती किंवा जमातीमधील असावी.

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

ग्रामीण भागातील महिलांना प्राधान्य दिले जाईल.

अर्जदार महिलेच्या नावे बँक खाते असणे आवश्यक आहे

आवश्यक कागदपत्रे

आधारकार्ड

जात प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

रेशन कार्ड

रहिवासी दाखला

बँक पासबुक/स्टेटमेंट

अलीकडील फोटो

BPL कार्ड (असल्यास)

गिरणी खरेदीसाठी कोटेशन

अर्ज कुठे करायचा 

आपल्या स्थानिक पंचायत समिती किंवा

जिल्हा महिला व बालकल्याण विभाग कार्यालयात अर्ज करावा.

अनुदान थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाईल.

महिलांनो, आजच अर्ज करा आणिसुरू करा स्वतःचा व्यवसाय