Bachat gat Pimple Khalasa

पिंपळे खालसा येथील बचट गटातील महिलांना प्रशिक्षण!

शिरूर तालुका

शिक्रापूरः यशस्विनी वेल्फेअर फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे खालसा येथील बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती ‘यशस्विनी’च्या दिपाली शेळके यांनी दिली.

पिंपळे खालसा येथे महिला बचत गटातील महिलांना सुगंधी फिनेल, भांडी घासण्याचे लिक्विड, पावडर, वॉशिंग पावडर, निळं हँडवॉश इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यावेळी ज्योती सुरसे, आश्विनी शेळके, वृषाली धुमाळ, मयुरी देशमुख, अलका झेंडे, आशा धुमाळ, प्रियंका सुरसे, रोहिणी भोसले, सुनिता अनपट, सोनाली धुमाळ, सारिका धुमाळ, जान्हवी सुरसे, सुप्रिया धुमाळ, प्रतिक्षा टेमगिरे, स्वप्नाली रुके, तेजस्वी धुमाळ, प्रमिला कांबळे, सुनिता सुरसे आदी महिला प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. प्रशिक्षक अशोक लगड यांनी महिलांना प्रशिक्षण दिले.

दिपाली शेळके म्हणाल्या, ‘शिरूर तालुक्यातील विविध गावांमधील महिला बचत गटातील महिलांना दैनंदिन लागणाऱया गोष्टींचे यापुढे प्रशिक्षण देणार आहोत. शिरूर तालुक्यात रांजणगाव एमआयडीसीमध्ये विविध कंपन्या आहेत. या कंपन्यामध्ये महिला बचत गटातील उत्पादने दिली जाणार आहेत. यामुळे शिरूर तालुक्यातील बचत गटातील महिलांना रोजगार निर्माण होण्यात मदत होणार आहे. शिवाय, बचत गटही सक्षम होतील.’

कंपन्यांना आवाहन…
शिरूर तालुक्यातील महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेली उत्पादने रांजणगाव एमआयडीसीमधील कंपन्यांनी घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन विविध महिला बचत गटांनी केले आहे.