कारेगाव येथील वेश्या व्यवसायास भाड्याने खोली देणारा मालक अजित इटनर याच्यावर गुन्हा दाखल

क्राईम मुख्य बातम्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत वेश्या व्यवसाय करण्यासाठी स्वतःच्या तीन मजली इमारतीत खोली भाड्याने देऊन जागा उपलब्ध करुन देणाऱ्या अजित देविदास इटनर या खोली मालकावर रांजणगाव पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिली.

 

कारेगाव (ता. शिरुर) येथील यश-इन चौकात अजित इटनर याची इमारत आहे. पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या पथकातील दर्शन दुगड (I.P.S) यांनी साध्या वेशामध्ये पुणे-नगर महामार्गावरील हॉटेल तसेच लॉजेस मध्ये चालणा-या अवैध धंद्यांबाबत माहिती काढत असतांना दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी अजित इटनर याच्या तीन मजली इमारतीमधील खोलीमध्ये वेश्या व्यवसाय चालु असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली.

 

या छापाच्या कारवाईमध्ये उडीसा राज्यातील एक ४० वर्षीय महिला मिळून आली. तिच्या असहाय्यतेच्या फायदा घेवुन अवैधरीत्या देहविक्री करायला लावणाऱ्या अर्जुन रामसमुझ वर्मा (वय २४) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. पुरेफेरी, सराया महेशा, तिलोई, जि. रायबरेली, उत्तर प्रदेश), मंगलसिंग संतोषसिंग गेहलोत (वय ३३) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे मुळ (रा. शिवनी खदान, ता.जि. अकोला) तसेच बबलु दुखबंधु साहु (वय ४०) सध्या रा. कारेगाव, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. तालघर, ता. जि. डेकालाल, उड़ीसा) यांच्यावर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

इटनर याच्यावर यापूर्वीही खंडणीचा गुन्हा…

अजित इटनर याच्यावर यापुर्वी रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली खंडणी गोळा केल्या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आता पुन्हा वेश्या व्यवसायासाठी स्वतःच्या इमारतीत खोली भाड्याने दिल्याने त्याच्यावर रांजणगाव पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला आहे.