मुख्यमंत्र्यांचा अवमान करणाऱ्या दोघांवर कारवाई करा…

राजकीय

साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध अवमानकारक वक्तव्य केल्या प्रकरणी साधू कटके आणि यांचे पुत्र संतोष कटके यांचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात येत असून साधू कटके आणि संतोष कटके वर कठोर कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी उद्या बुधवार दि .13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने साकीनाका पोलीस ठाण्यावर तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे उत्तर मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केली आहे.

मुख्यमंत्रीपद संविधानिकपद आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुती चे नेते आहेत.त्यांच्या विरुद्ध अपशब्द काढून त्यांचा अवमान करण्याचा केलेला प्रयत्न हा अक्षम्य आहे.या अवमानकारक वक्तव्याबाबत साधू कटके आणि त्यांचा पुत्र संतोष कटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सन्मानासाठी रिपब्लिकन पक्षात मैदान उतरला असून उद्या साकीनाका पोलीस ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अवमान करणाऱ्या साधू कटके आणि संतोष कटके यांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षातर्फे आंदोलन करण्यात येणार आहे.

साधू कटके यांच्या पुत्राने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करून साधू कटके यांनी रिपब्लिकन पक्षाचा विश्वासघात केला आहे.त्यामुळे त्यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे आणि रिपाइं मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केली आहे.