आश्रम शाळेत समता दिन साजरा करत जनजागृती

शिरूर तालुका

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्ताने शाहू महाराजारांना अभिवादन करत अर्पण करत समता दिन साजरा करत समता दिनाची जनजागृती करण्यात आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील आनंदाश्रम प्राथमिक शाळेत राजर्षी शाहू महाराज जयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करुन समता दिन साजरा करत समता दिनाबाबत जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्षा उषा वाघ, निवृत्ती जनसंपर्क अधिकारी संजय मोरे, संस्थेचे सचिव जालिंदर आडसुळे, उपाध्यक्ष मधुकर शिंदे, संचालक सुनील कामत, समन्वयक बुधा बिराडे, प्रा. रचना अडसुळे, प्रा. निशा भंडारी, डॉ. चंद्रकांत केदारी, वसतिगृह अधीक्षक शंकर मुनोळी, मुख्याध्यापक अशोक वाडीले, प्रतिभा गवळी, आदर्श कलाशिक्षक प्रविणकुमार जगताप, प्रा. एन. बि. मुल्ला यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी प्राचार्य डॉ. जालिंदर अडसुळे यांचा सेवानिवृत्ती बद्दल, प्रसाद पवार यांचा पोलीस उपनिरीक्षक पदी निवडी बद्दल, सुमित गवारी याचा परराज्यात शिक्षणासाठी निवडीबद्दल तर आश्रम शाळेचे विद्यार्थी माधुरी आहिरे व जनाबाई राठोड यांनी उच्च शिक्षण घेत नोकरी मिळविल्याबद्दल मानपत्र देत विशेष सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आश्रम शाळेचे विजय भोर, केशव पवार, शंकर शिंदे, विजया अहिरे, सुनिता शेरखाने, सोनाली शिंदे, निलेश देसले, बालाजी बोरकर, दिलीप गायकवाड, ज्ञानेश्वर लोंढे, माधुरी रासे, बालाजी बोरकर, मीना वाघ, रुपाली बागले, संजीवनी गोंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप गोसावी यांनी केले तर प्रास्ताविक संपत कांबळे यांनी केले आणि मुख्याध्यापक अशोक वाडीले यांनी आभार मानले.