हिवरे कुंभारच्या कल्पेशला शोधण्यास धावला सारा गाव

शिरूर तालुका

तब्बल दीड तासात त्या बालकाला केले पालकांच्या स्वाधीन

शिक्रापूर: हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत नव्याने दाखल झालेला कल्पेश सूर्यवंशी हा मुलगा शाळेतून अचानक गायब झाल्याचे समोर येताच संपूर्ण गावातील युवकांनी एकवटून तब्बल दीड तासाच्या प्रयत्नाने त्या बालकाला शोधून शिक्षकांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन करुन एकजुटीची ताकद दाखवून दिली आहे.

हिवरे कुंभार (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद शाळेत कल्पेश सूर्यवंशी हा युवक नव्याने पहिलाला दाखल झालेला त्यामुळे शाळेत बसल्याने तयार नव्हता. त्यामुळे त्याचे वडील शाळेच्या बाहेर बसून राहिली होते. काही वेळाने कल्पेश नजरचुकीने शाळेच्या बाहेर गेला सायंकाळच्या सुमारास कल्पेशचे वडील आल्यानंतर कल्पेश नसल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली.

दरम्यान येथील युवकांनी त्याचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित केले. त्यावेळी तो बालक धामारी रस्त्याने गेल्याचे समजले त्यावेळी विठ्ठल जाधव, प्रवीण टाकळकर, माणिक जगताप, कुमार गायकवाड, अनिल तांबे, अमोल झेंडे, सत्यवान देशमुख, ओंकार चातुर, अक्षय टाकळकर, ज्ञानेश्वर भुमकर यांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून धामारी रस्त्याने जात त्या बालकाचा शोध घेत त्याला शाळेच्या परिसरात आणून शिक्षकांच्या उपस्थितीत पालकांच्या स्वाधीन केले. यावेळी कल्पेशचे वडील पिंटू सूर्यवंशी यांनी सर्व युवकांचे आभार मानले. मात्र युवकांनी दाखविलेल्या एकजुटीचे अनेकांनी कौतुक केले.