रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या वतीने साधना शितोळे यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था तसेच रामलिंग महिला पतसंस्था यांच्या वतीने (दि 3) जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिरुर येथील जिल्हा शिक्षका साधना शितोळे यांना सावित्रीबाई फुले पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण समुपदेशन केंद्राचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

 

यावेळी बोलताना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच आज महिला सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. त्यांच्यामुळेच सर्वसामान्य कुटुंबातील मुली आज शिक्षण घेत आहेत. म्हणून हा दिवस बालिका दीन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाईंचे कार्य महान होते. त्यांच्या या कार्याची प्रेरणा प्रत्येक शिक्षिकेला यांना मिळावी.

 

तसेच शिक्षण क्षेत्रात ज्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांना दरवर्षी प्रमाणे एक पुरस्कार देण्यात येतो. यामुळे त्यांनाही काम करण्यास प्रेरणा मिळते. त्यामुळे यावर्षी मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या साधना शितोळे यांना सन 2024 चा सावित्रीबाई फुले पुरस्कार देण्यात आला.

 

यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) महिला तालुका अध्यक्षा विद्या भुजबळ, युवती तालुका अध्यक्षा संगीता शेवाळे, तालुका महिला उपाध्यक्षा राणी शिंदे, शिरुर शहर अध्यक्षा डॉ स्मिता कवाद, युवती अध्यक्षा गितारानी आढाव, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती पारधी, रुपाली बोर्डे, शीला पाचंगे, सुवर्णा पाचंगे, डॉ वैशाली साखरे, सविता बोरुडे, प्रीती बनसोडे, लताबाई खपके, पत्रकार रुपाली खिल्लारी, शिक्षिका मिरा भोगवडे, नंदिनी शिर्के, वाखारे, डुंबरे, साकोरे,भालेकर आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.