नागपंचमीनिमित्त शिव भक्ताकडून नरेश्वर चरणी दीड किलो चांदीचे शिवलिंग

शिरूर तालुका

शिक्रापूर: सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताकडून नागपंचमी निमित्ताने तब्बल दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग अर्पण करण्यात आले असून सदर शिवलिंग स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिव पुजारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्री क्षेत्र नरेश्वर मंदीर येथे एका शिव भक्ताने देवावरील श्रद्धा जपत मंदिरासाठी तब्बल दीड किलो वजनाचे चांदीचे शिवलिंग अर्पण करण्यात आले असून सदर शिवलिंग मंदिराचे शिवपुजारी दरेकर महाराज यांचे हस्ते पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर, सावता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरख भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय हरगुडे, सोसायटीचे गोरक्षनाथ दरेकर, मानवाधिकार एवं सामाजिक शिष्टमंडळ महाराष्ट्र राज्य सचिव विकास हरगुडे यांचेकडे सुपुर्द करण्यात आले.

दरम्यान शिवलिंग अर्पण करणाऱ्या शिवभक्ताचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तर यावेळी बोलताना सदर नरेश्वर मंदिर हे डोंगराच्या ठिकाणी असून सुरक्षिततेच्या हेतूने काही सन, उत्सव यावेळी शिवलिंग मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडीत दरेकर यांनी सांगितले, तर सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरु असून ज्या भाविकांना हातभार लावायचा असेल त्यांनी येथे मदत करावी, असे आवाहन सावता परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष गोरख भुजबळ यांनी केले.