शिक्रापूरसह शिरुर तालुक्यात पसरली धुक्याची चादर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): धुके पाहण्यासाठी तसेच धुक्यामध्ये सकाळच्या सुमारास फिरण्यासाठी अनेकदा नागरिक बाहेरील जिल्ह्यांमध्ये जाऊन धुक्यामध्ये फिरण्याचा आनंद घेत असतात. मात्र आज पहाटेपासूनच शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरल्याचे दिसून आले.

शिक्रापूर (ता. शिरुर) साज आजूबाजूच्या सणसवाडी, कोरेगाव भीमा, तळेगाव ढमढेरे, कोंढापुरी, जातेगाव, कासारी, रांजणगाव गणपती, उरळगाव, दहिवडी, टाकळी भीमा, विठ्ठलवाडी यांसह आदी गावांसह तालुक्यातील किमान तापमानामध्ये घट झाल्याने आज पहाटेपासूनच सर्व ठिकाणी धुके दिसून आले, सकाळच्या सुमारास सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुके असल्याने रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहन चालकांना वाहनांच्या लाईट लावूनच सावकाश पद्धतीने जावे लागत होते.

धुक्यांमुळे सर्वत्र पाण्याचे थेंब साचून राहिलेले असल्याचे दिसलेले असल्याने नागरिकांना आपण बाहेर देशात किंवा पर्यटन च्या ठिकाणी आल्याचे भासू लागले होते. मात्र सदर हवामान काही पिकांसाठी धोकादायक असल्याने शेतकरी चिंतेत आले असल्याची स्थिती निर्माण झाली आहे, तर असे वातावरण कायम राहिल्यास पिकांचे काय होणार असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे.