चंद्रशेखर आझादांनी केले विजयस्तंभाला अभिवादन

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे एक जानेवारी रोजी झालेल्या २०५ व्या शौर्यदिनी जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी हजेरी लावत जयस्तंभाला अभिवादन केले.

दरम्यान भीम आर्मीचे शिरुर तालुकाध्यक्ष दीक्षांत भालेराव यांच्या हस्ते चंद्रशेखर आझाद यांचा जयस्तंभाची प्रतिकृती भेट देत सन्मान करण्यात आला. मात्र यावेळी झालेली लाखोंची गर्दी पाहून चंद्रशेखर आझाद यांनी तातडीने बाहेर पडणे पसंत केले.