abdul-sattar-nitin-thorat

शिरूरच्या शिष्टमंडळाची शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा…

शिरूर तालुका

शिरूरः राष्ट्रीय किसान मजूर महासंघाच्या शिष्टमंडळांनी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून निवेदन दिले आहे, अशी माहिती राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात यांनी दिली.

सदर निवेदनात म्हटले आहे की, ‘शेतकऱ्यांना कृषीपंपाला विज पुरवठा रात्रीच्या वेळी करण्यात येत असल्याने पुरेशी झोप न मिळू शकल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना वेळेत आरोग्य सेवा न मिळू शकल्याने त्या शेतकऱ्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर तो त्याच्या कुटुंबाकरीता अपघातच आहे. या घटनेला अपघात समजून शेतकऱ्याच्या वारसांना शेतकरी अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.’

सदर राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाच्या शिष्ट मंडळामध्ये शेतकरी नेते राज्याचे उपाध्यक्ष नितीन थोरात, अध्यक्ष शंकर दरेकर, भाऊसाहेब माशेरे, आबासाहेब जाधव, अक्षय माशेरे, किरण दरेकर, विनायक जेउघाले, युवराज सूर्यवंशी आदी उपस्थित होते.