केंदूर मधील पाचवड शाळेच्या मुलांनीच केली शाळेला मदत

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): ग्रामीण भागामध्ये लोकसहभाग व शालेय मुलांच्या मदतीने शाळेचे विकास होऊन शाळा आदर्श होत असताना शिरूर तालुक्यातील 2 शालेय विद्यार्थ्यांनीच शाळेचे विकासासाठी पुढाकार घेत शाळेला काही रक्कम देणगी देऊ केली आहे.

केंदूर (ता. शिरूर) येथील शाळेतील मुलांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेलाच मदत करण्याचा निर्णय घेत युगांक शरद साकोरे व समृद्धी अमोल लिमगुडे या दोघा विद्यार्थ्यांनी शाळेसाठी सुमारे प्रत्येकी २५०० देऊन शाळेसाठी मदत केली. तर विद्यार्थ्यांच्या मदतीनंतर बोलताना अशा लोक सहभागातुन शाळेसाठी संगणक खरेदी करण्याचा मानस असल्याचे मुख्याध्यापक कांता साकोरे यांनी सांगितले.

सध्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये ग्रामस्थ स्वखर्चातून शाळेला मदत करत असतात त्यातूनच शाळेच्या भौतिक विकासासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामध्ये पाचवड वस्तीवरील शाळा पहिली ते चौथी लहान गटात असून या शाळेसाठी तेथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात. या शाळेच्या माध्यमातून शाळेचा भौतिक विकास करण्यात आला आहे.

त्यामध्ये शाळेत कारपेट, विविध पुस्तके खरेदी करण्यात आलेले आहेत. शाळेचे रंगोटी व परिसर सजवण्यात आलेला आहे. या शाळेचा गुणात्मक दर्जाही उत्तम असून येथील मुलांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेले आहे. या शाळेच्या बदलासाठी येथील ग्रामस्थ व मुख्याध्यापिका कांता साकोरे व सहशिक्षिका रोहिणी नाईकरे काम करत आहेत.