रामलिंग महिला पतसंस्था आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचा वटवृक्ष होईल; सुजाता पवार 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (किरण पिंगळे): हळदीकुंकू हे फक्त एक निमित्त असुन यामुळे सर्व महीला एकत्र येतात व यातूनच विचारांची देवाण घेवाण होते आणि महिला सक्षम बनत असतात. रामलिंग महीला पतसंस्था व रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांचे कार्य खूप मोठे असुन या लावलेल्या छोटेशा रोपट्याचा भविष्यात नक्कीच मोठा वटवृक्ष होईल, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांनी केले.

रामलिंग येथील सामाजिक सभागृहात रामलिंग महिला पतसंस्था आणि रामलिंग महीला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि सायबर सुरक्षा महीला कायदा विषयक मार्गदर्शन शिबिराचे शनिवार (दि 28) रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार आणि रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या महिला अंमलदार मोनिका वाघमारे यांनी सायबर सुरक्षा यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिप्रज्वलन तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. मान्यवरांच्या मनोगतानंतर महिलांचे उखाणे तसेच विविध खेळ घेण्यात आले.

यावेळी बोलताना रामलिंग महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या हळदीकुंकू हे फक्त सुवासिनी स्त्रीयांसाठी नसून यात मी विधवा महीला यांनाही तेवढेच मानाचे स्थान देते. त्यामुळे या हळदीकुंकू समारंभ कार्यक्रमामध्ये विधवा महिला सुद्धा सन्मानपुर्वक सहभागी होतात. त्यामुळे सर्वच महिलांनी विचार बदलण्याची गरज असुन आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सुवासिनीची वागणूक मिळाली. तर ती स्त्री खंबीर पणे स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. त्यामुळे विचार बदला आणि या सर्व स्त्रियांना आधार द्या.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार, पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार, महिला अंमलदार मोनिका वाघमारे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, पत्रकार किरण पिंगळे, वैशाली बांगर, अर्चना कर्डिले, छाया जगदाळे, सालेहा शेख, दिपाली आंबरे, संध्या गायकवाड, संगीता दसगुडे, श्रुतिका झांबरे, सुवर्णा सोनवणे, मीना गवारे, आरती चव्हाण व अनेक आजी माजी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला निचित आणि आभार राणी बंग यांनी मानले.