शिरुर तालुक्यातील महिला संघटनेच्या वतीने सीमेवरील जवानांना “रक्षाबंधन” निमित्त राख्या

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र देशाच्या सीमेवर तैनात असणाऱ्या सैनिक बांधवांना राखी पाठवण्याचा उपक्रम माजी सैनिक महिला संघटनेच्या वतीने राबविण्यात आला. तसेच यावर्षी सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्यासाठी माजी सैनिक महिला संघटना, समस्त महिला आघाडी निमगाव भोगी यांनीही सहकार्य केले. यामध्ये प्रामुख्याने निमगाव भोगीच्या सरपंच सुप्रिया पावसे यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत ग्रामपंचायतच्या वतीने त्यांनीही सैनिकांना राख्या पाठविण्यासाठी दिल्या.

 

यामध्ये प्रामुख्याने निमगाव भोगी गावातील हनुमान माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा, तसेच अंगणवाडीच्या लहान मुलांनीही सीमेवरील जवानांना राख्या पाठविण्यासाठी दिल्या. तसेच गावातील सुवासिनी महिला बचत गट, युक्ती महिला बचत गट, कुलस्वामिनी महिला बचत गट, यश महिला बचत गट, जिजामाता महिला बचत गट, भक्ती महिला बचत गट, यांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवत सीमेवरील जवानांना राख्या पाठवण्यासाठी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने सरपंच सुप्रिया पावसे, हनुमान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भोस सर, विविध महिला बचत गटाच्या अध्यक्ष व सचिव उपस्थित होत्या.

 

यामध्ये नीता लोखंडे, स्वाती रसाळ ,नीलम रासकर, प्रमिला सांबारे, सविता इचके, शालिनी जाधव, प्रमिला राऊत, वर्षा मोडवे, अंगणवाडी शिक्षिका मीरा रासकर यांनी सर्वांनी निमगाव भोगीच्या पोस्टमन तेजश्री जाधव यांच्याकडे सर्व राख्या सीमेवरील जवानांना पाठवण्यासाठी दिल्या.

 

निमगाव भोगी येथील उज्वला इचके यांचा पुढाकार…

गेल्या सात ते आठ वर्षापासुन रक्षाबंधनाचे औचित्य साधुन सीमेवरील सैनिक बांधव यांना राखी पाठवण्याचा उपक्रम गेल्या काही सात ते आठ वर्षांपासून निमगाव भोगी येथील माजी सैनिक संघटनेच्या वतीने राबविण्यात येतो. परंतु यावर्षी या कार्यक्रमाला एक वेगळे स्वरुप देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत त्याचप्रमाणे विविध महिला बचत गटांनी पुढे येऊन या राखीच्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला. काही वर्षांपुर्वी या कार्यक्रमाची सुरुवात उज्वला इचके व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. आज शिरुर तालुकाच नव्हे तर वेगवेगळ्या गावात माजी सैनिक संघ व माजी सैनिक महिला बचत गटाच्या माध्यमातुन संपूर्ण जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे.