वृक्ष संवर्धनासाठी नागरिकांनी पुढे येथे गरजेचे; हरिष येवले

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील गायरान जमीनीत माहिती सेवा समितीच्या माध्यमातून उभारलेल्या धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्पाचा नागरिकांनी आदर्श घेत प्रत्येक नागरिकांनी वृक्ष संवर्धनासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत उद्योजक हरिष येवले पाटील यांनी व्यक्त केले आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथे माहिती सेवा समिती व माहिती सेवा वृक्ष संवर्धन समितीच्या माध्यमातून एक वर्षापासून धर्मनाथ देवराई वनराई प्रकल्प उभारून वृक्षारोपणाचे कार्य केले जात असून अद्याप पर्यंत तब्बल 21 हजार झाडे येथे लावण्यात आलेली असून झाडांच्या संगोपनासाठी देखील विशेष काळजी घेतली जात असते.

वृक्षारोपण प्रसंगी बोलताना सध्या प्रत्येकाला जगण्यासाठी झाडांची गरज झाडे असल्यास पाऊस चांगला पडतो, तसेच आरोग्य देखील उत्तम राहते, त्यामुळे प्रत्येकाने झाडांचे महत्व ओळखून झाडांच्या संर्वधन साठी पुढे यावे, असे उद्योजक हरिष येवले पाटील यांनी सांगितले.

यावेळी माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, माहिती सेवा समिती वृक्षसंवर्धन समितीचे शिरुर तालुकाध्यक्ष धर्मराज बोत्रे, डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे, माहिती सेवा समितीचे तालुकाध्यक्ष शरद टेमगिरे, शिरुर बाजार समितीचे माजी संचालक दत्तात्रय हरगुडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव यांसह आदी उपस्थित होते

यावेळी बोलताना प्रत्येकाने आठवड्यातून एका दिवसातील काही तास अशा कामांना दिल्यास चांगली वनराई प्रत्येक ठिकाणी उभी राहील, असे डिंग्रजवाडीचे माजी सरपंच राहुल गव्हाणे यांनी सांगितले, तर माहिती सेवा समिती वृक्षसंवर्धन समितीचे शिरुर तालुकाध्यक्ष धर्मराज बोत्रे यांनी सर्वांचे आभार मानले.