शिरुर (अरुणकुमार मोटे) पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे डॉ महिलेवर झालेला अत्याचार आणि हत्या व बदलापूर महाराष्ट्र मध्ये अल्पवयीन (चिमुकल्या) मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ व स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी न्यायासाठी उत्तम व्यवस्था उभी करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थेच्या, राज्यकर्त्यांच्या आणि अशा गंभीर घटना गांभीर्याने न घेणाऱ्या बदलापुर पोलिसांच्या निषेधार्थ शुक्रवार दि. २३ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणआंदोलन आणि याच निषेधार्थ मुंडण करुण तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
कु. निलम सुरेश टेमगिरे (रा.बुरुंजवाडी) ह्या विद्यार्थिनीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर सकाळी ११ वाजल्यापासुन शिरुर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आणि सायंकाळी ५ वाजता निषेधार्थ मुंडण करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने विविध संघटनेच्या महिला, विविध सामाजिक, राजकीय संघटना तसेच सामाजिक कार्यकर्ते तरुणवर्ग उपस्थित होते. महिलांनी व नागरिकांनी यावेळेस कोलकत्ता तसेच बदलापुरच्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली “भीक नको सुरक्षा हवी” अशा घोषणा देत छत्रपतींच्या स्वराज्याप्रमाणे महिलांच्या सुरक्षेबाबत कायदा लागू करा आणि जर सरकारला हे जमत नसेल. तर असे गुन्हेगार आमच्या ताब्यात द्या. आम्हीच त्याला शासन करु अशा तीव्र भावना यावेळेस महिलांनी व्यक्त केल्या. यावेळेस अनेक लोकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत निषेध व्यक्त केला.
शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना आंदोलनस्थळी निवेदन देण्यात आले तहसीलदारांसमोर महिलांनी आपल्या मागण्यांबाबत व्यथा मांडल्या तहसीलदारांनी आंदोलनातील नागरीकाच्या भावना जाणून घेऊन आंदोलनातील मागण्या शासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगण्यात आले. यानंतर तहसीलदार यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण सोडण्यात आले.
यावेळी रामलिंग महिला उन्नती सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले, आधार छाया फाऊंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, प्रहार दिव्यांग संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्षा अनिता कदम, जनता दलाचे संजय बारवकर, यशवंत सेनेचे रामकृष्ण बिडगर, राष्ट्रीय किसान मजदूर महासंघाचे उपाध्यक्ष नितीन थोरात, मंगलमूर्ती स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष ॲड सौरव वाव्हळ, काँग्रेसचे रामदास थोरात तसेच विविध महिला,सामाजिक,राजकीय संघटनांनी व विविध गावांतील नागरीकांनी पाठिंबा देत कोलकाता आणी बदलापूर येथील घटनेंचा निषेध व्यक्त केला.
यावेळी गिता आढाव, जयश्री कानडे, संजय कुरंदळे, केशव शिंदे, मयुर लाळगे, सिमा गिरमकर, प्रदीप दसगुडे, किरण कुरंदळे, ज्ञानेश्वर कुरंदळे, शेखर कुरंदळे, सोमनाथ देव्हाडे, प्रियंका धोत्रे, पुजा शितोळे, विनोद भालेराव, गणेश घावटे, शारदा भुजबळ, दिनेश कर्डिले, वैशाली महाले, रेणुका मल्लाव, दत्ता येवले, शारदा भुजबळ, फिरोज सय्यद शशिकांत निरवणे, जाकीर काजी, तहसील खान, साजिद शेख माया मोहिते आदींनी या आंदोलनास उपस्थित राहुन पाठिंबा दिला.
हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन पण…
मुंबई येथील बदलापुर येथे लहान मुलीवर अत्याचाराची एवढी गंभीर घटना घडल्यानंतर त्या मुलीच्या गरोदर आईला पोलिस स्टेशन मध्ये अनेक तास ताटकळत बसाव लागलं. याच घटनेच्या निषेधार्थ शिरुर पोलिस स्टेशन पासुन हाकेच्या अंतरावर शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी आंदोलन केलं. यावेळी विविध संघटना तसेच लोकांनी वाळुंज यांना पाठिंबा दिला. मात्र पोलिस निरीक्षक तसेच पोलीस ठाण्यातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन महिलांच्या सुरक्षेबाबत महिलांच्या भावना व मागण्या जाणुन घेण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शिरुर पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस अधिकारी महिलांच्या सुरक्षेबाबत किती गांभीर्यपुर्वक लक्ष देत असतील याची प्रचिती त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच आली. त्यामुळे शिरुर पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या ह्या कृतीबद्दल महिलांनी व आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जेष्ठ समाजसेवक पद्मभूषण आण्णा हजारे यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेऊन अशा प्रकरणांबाबत कठोर कायद्याच्या मागणीसाठी व्यापक स्वरुपात चळवळ उभी करणार आहे. यासाठी विविध संघटनांना एकत्रित येण्याचे आवाहन करुन पुढील काळात मोठे जनआंदोलन छेडणार आहे.
निलेश यशवंत वाळुंज
(सामाजिक कार्यकर्ते) अण्णापुर
चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के
शिरुर; लाडक्या बहिणीला भिक्षा नको, सुरक्षा हवी म्हणत महाविकास आघाडीच्या वतीने भर पाऊसात मुक आंदोलन
शिरुर शहरात ट्रकच्या बॅटऱ्या चोरणारा गजाआड पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप यांची दंबंग कामगिरी
Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक