shikrapur police and eid

शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी घेतला अनोखा निर्णय…

शिरूर तालुका

शिक्रापूर (तेजस फडके): आषाढी एकादशी व बकरी ईद एकच दिवशी आल्याने कुर्बानी न देण्याचा शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधवांनी निर्णय घेतला आहे. हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्यासाठी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांची मोलाची कामगिरी ठरली आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन (ता. शिरूर) हद्दीतील मुस्लिम बांधवांची पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व पोलिस बांधव यांच्या उपस्थितीत बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी मुस्लिम बांधवांशी संवाद साधत एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत सामाजिक सलोखा जपायला हवा, असे आवाहन करताना मुस्लिम बांधवांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत बकरी ईद च्या दिवशी कुर्बानी न देण्याचा निर्णय घेत तसे लेखी निवेदन दिले.

बैठकीमध्ये मुस्लिम बांधवांनी बकरी ईद व “देवशयनी आषाढी एकादशी” एकाच दिवशी गुरुवार दिनांक २९ जून रोजी येत असल्याने व तो दिवस हिंदू धर्मामध्ये पवित्र असल्याने सदर दिवशी कुर्बानी देणार नसून, शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील सर्व मुस्लिम बांधव शुक्रवार ३०/०६/२०२३ रोजी कुर्बानी देणार असल्याचे निवेदन दिले आहे. तरी, मुस्लिम बांधवांनी घेतलेला निर्णय हा स्तुत्य व सामाजिक बांधिलकी जपणारा असल्याने त्यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
यावेळी शिक्रापूर पोलिस स्टेशन हद्दीतील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांचे मोलाचे सहकार्य…
आषाढी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने व तो दिवस हिंदू धर्मामध्ये पवित्र असल्याने सदर बाबतीत मुस्लिम बांधवांनी पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर राखत ईद च्या दिवशी कुर्बानी देणार नसून, शुक्रवार दिनांक ३० जून ला कुर्बानी देणार असल्याचे निवेदन दिले. पण यासाठी प्रबोधनाचे मोलाचे काम पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी केले.