सणसवाडीच्या विद्यालयास संगणक प्रयोगशाळा प्रदान

शिरूर तालुका

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कंपनीचा विद्यार्थ्यांसाठी उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): तंत्रज्ञानाच्या नवीन स्पर्धेच्या युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करता येऊन शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यात मदत होऊन भविष्यात त्यांना शहरी भागाच्या विद्यार्थ्यांसमोर आव्हान निर्माण करण्यासाठी आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कारखान्याच्या वतीने सामाजीक बांधीलकीतून विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा निर्माण करुण देण्यात आल्याचे दिल्याचे आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल कारखान्याचे मनुष्यबळ व संसाधन विभाग प्रमुख मुकुंद जागिरदार यांनी सांगितले.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील माध्यमीक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या संगणक प्रयोगशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मुकुंद जागिरदार बोलत होते. यावेळी विभागप्रमुख सुरेश कदम, दिपक निकुंभ, सीएसआर विभाग प्रमुख सतीश भुसाळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबाजी गोरे, संस्थेचे सचिव बाबासाहेब साठे, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच विद्यार्थ्यांसह अन्य कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते.

आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टिल इंडिया लिमीटेड या कारखान्याच्या वतीने उभारण्यात आलेल्या संगणक प्रयोग शाळेत वीस २० संगणक व त्यासाठी अत्यावश्यक सुविधा निर्माण केली असून शालेय व्यवस्थापन समितीच्या विनंतीनुसार सदर संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आली असून या प्रयोग शाळेचा 1 हजार 230 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लाभ होणार आहे.

यावेळी पुढे बोलताना मुकुंद जागिरदार यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या माहिती तंत्रज्ञान ज्ञान आणि कौशल्यांचा विस्तार करण्यासाठी व त्यांच्या शैक्षणिक विकास उपक्रमांतर्गत ही संगणक प्रयोगशाळा विकसित केली असून संगणक व त्याच्याशी संबंधित तंत्रज्ञान व्यवसाय, शिक्षण आणि वैयक्तिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले असल्याचे देखील मुकुंद जागिरदार यांनी सांगितले. दरम्यान मुख्याध्यापक बाबाजी गोरे यांनी सर्वांचे आभार मानले.