वरुडेच्या शाळेत कीर्तन महोत्सवाचा अनोखा उपक्रम

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): मुलांना किर्तन म्हणजे काय? मुलांवर संस्काराची चांगली बिजे रोवण्यासाठी अधात्म्याच्या माध्यमातून ह.भ.प.विश्वास महाराज गाडगे यांनी अनोखा उपक्रम राबवत शाळेमध्ये किर्तन आयोजित केले होते. गाडगे महाराजांनी किर्तनात संत तुकाराम महाराज यांच्या गोकुळच्या सुखा या अभंगातुन आदर्श विद्यालय वरूडे (ता. शिरूर) आणि जि.प.शाळा वरूडे येथे किर्तन सादर केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ व तरुण मंडळींनी किर्तनात सहभाग घेतला होता.

गायक वसंत महाराज भोसले, पन्नालाल काळे, हार्मोनियम नाथाभाऊ मिडगुले, पखवाज वादक अथर्व डफळ धामारी विणेकरी बबन भाऊ फंड, बाळासाहेब तांबे, जगदीश भोसले आणि काही विद्यार्थी टाळ वाजवण्यात सहभागी झाले होते. यावेळी मुलांना किर्तन कळावे म्हणून अगदी मुलांच्या आवडीचे काल्याचे किर्तन करण्यात आले.

दही आणि लाहीचा प्रसाद मुलांना वाटुन वरुडे गावचे उद्योजक हनुमंत तांबे यांनी खाऊ वाटप केले आयोजक आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी सर, निकम सर गभाले गुरूजी, नाना नाणेकर गुरूजी, साळे गुरूजी आदी सर्वच शिक्षक लोक सहभागी होऊन प्रोत्साहन देऊन भगवत कार्याला शुभेच्छा देऊन शाळेच्या वतीने महाराजांचा सन्मान करण्यात आला. काही दिवसांपुर्वी शाळेतील पहिले किर्तन कान्हुर मेसाई येथील विद्याधाम विद्यालय पार पडले होते.