सोमनाथ भंडारे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व मुख्याध्यापक संघाच्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ भंडारे यांनी आज पर्यंत शालेय शिक्षणाबरोबर शाळेच्या भौतिक सुविधांकडे देखील चांगल्या पद्धतीने लक्ष देत विद्यार्थ्यांसह शाळेचा विकास साधला आहे. अनेक वर्षापासून त्यांनी शाळेच्या निकालाची परंपरा अबाधित ठेवली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी शालेय शिक्षण विभागाचे अवर सचिव दिपक शेलार, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनंदा वाखरे, शशांक मोहिते, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, कार्याध्यक्ष मधुकर नाईक, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजीराव कामथे, सचिव प्रसाद गायकवाड, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले, शिरुर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, सचिव मारुती कदम यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सोमनाथ भंडारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने श्री धर्मवीर शंभूराजे शिक्षण प्रसारक मंडळ यांसह वढू बुद्रुक ग्रामस्थांनी सोमनाथ भंडारे यांचे अभिनंदन केले.