जितेंद्रकुमार थिटे यांना डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर येथील प्रा. जितेंद्रकुमार तानाजी थिटे यांना मुंबई सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को ऑपरेटीव्ह सोसायटीच्या वतीने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

पाबळ (ता. शिरुर) येथील श्री भैरवनाथ विद्या मंदिर येथील प्रा. जितेंद्रकुमार तानाजी थिटे यांना दादर मुंबई येथील शिवाजी नाट्य मंदिरात आयोजित येणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार राज्य स्तरावरचा असल्याने शिक्षण क्षेत्रातील वरिष्ठ स्तरांवरील मान्यवरांसह शिवम प्रतिष्ठानचे अध्यक्ष इंद्रजीत देशमुख यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकानुसार जाहीर केली आहे.

पाबळ येथे प्राध्यापक म्हणून परिसरात परिचित असलेले प्रा. जितेंद्रकुमार थिटे हे सध्या महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे कार्यकारीणी सदस्य म्हणून कार्यरत असून महाराष्ट्र राज्य भूगोल परिषदेचे तसेच सेकंडरी स्कूल एम्पॉईज कॉ ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीचे समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.