grahak-panchayat

ग्राहक पंचायत पुणे जिल्हा या संस्थेचे उद्घाटन!

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (अरुणकुमार मोटे): रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्य व्यापी नवीन संस्थेचा निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला आहे.

ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी व ग्राहकांना शोषणमुक्त करण्यासाठी ही संस्था स्थापन केली आहे. या निमित्ताने निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे, शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपकार्यकारी अभियंता महावितरण शिक्रापूरचे नितीन महाजन, शाखा अभियंता पाचुंदकर, रांजणगाव देवस्थानच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर, ग्राहक पंचायत पुणे चे संस्थापक अध्यक्ष अशोक भोरडे, राज्य उपाध्यक्ष जनार्दन पांढरमिसे, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड, वनपरिक्षेत्र शिरूर चे प्रताप जगताप, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर चे अरुण साकोरे या मान्यवरांनी संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित नागरिक ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त जिल्हा न्यायाधीश यांनी उपस्थितांना कायद्याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी ॲड. बाबुराव ढमढेरे, भगवान थोरात, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार अरुणकुमार मोटे, तेजस फडके, उद्योजक संदीप कुटे, चेतन भोर, अभिषेक टेंभेकर, संदीप टूले, प्रमोद लांडे, बाबासाहेब थिटे, अतुल पाचुंदकर, दत्तात्रय रवलेकर, माजी सरपंच प्रवीण आव्हाळे, ॲड. गणेश तोडकर, उद्योजक विजय करपे, राहुल करपे तसेच शिरूर, हवेली, दौंड, जुन्नर, खेड या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात ग्राहक पंचायत चे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?

शिरुर; भाजपच्या दोन पदाधिकाऱ्यांची अवैध धंद्यावरुन जुंपली, एकाचे पोलिसांवर आरोप तर दुसऱ्याकडुन पाठराखण

शिरुरच्या नवनिर्वाचित पोलिस निरीक्षकांपुढे कायदा सुव्यस्था राखण्याचे मोठे आव्हान