कृषि संजीवनी सप्ताहात शेतकर्‍यांनी सक्रीय सहभागी व्हा; शिवाजी गोरे

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने संपूर्ण तालुक्यात खरीप हंगाम अनुशंगाने (दि. 25) जुन ते 1 जुलै पर्यंत कृषी संजीवनी सप्ताह सुरु केला असुन त्याची सुरवात चिंचणी (ता. शिरुर) गावातून करण्यात आली. या सप्ताहात विविध पिकाचे तंत्रज्ञान तसेच पौष्टिक आहार कृषी क्षेत्रातील महिलाचा सहभाग तसेच विविध योजनाची माहिती मिळण्याकामी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांनी केले. तसेच महाडीबीटी योजने अंतर्गत ठिबक, तुषार सिंचन, कृषी यांत्रिकीकरण व फळबाग लागवड, पीएमएफएमई अंतर्गत खाद्य उद्योगांना अर्थसहाय्य तसेच पीएम किसान सन्मान योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान बाबतही माहिती दिली.

या कार्यक्रमात कृषी पिक तंत्रज्ञान प्रसार या उपक्रमा अंतर्गत ऊस लागवड तंत्रज्ञान, बाजरी तंत्रज्ञान मध्ये लागवडीच्या वेळी बेसल डोसचा वापर तणनाशकाचा वापर संतुलित खतांचा वापर किड व रोग व्यवस्थापन बेणे व बीज प्रक्रिया बाबत तंत्रज्ञान अवगत करुन कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याबाबत कृषी सहायक जयवंत भगत सविस्तर माहिती यांनी दिली.

या कार्यक्रमासाठी चिंचणीचे उपसरपंच अनिल सुभेदार पवार तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हनुमत पवार, बापु पवार बाळासाहेब पवार, गोरख पवार, प्रकाश पवार, राजेंद्र पवार शिवाजी पवार, अशोक पवार, आकाश पवार, नवनाथ दत्तात्रय पवार, विकास घाडगे, लक्ष्मण पवार यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी देविदास घुंगसे, कृषी सहायक जयवंत भगत व कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे यांच्यासह उपसरपंच अनिल पवार व प्रकाश पवार यांनी विशेष योगदान दिले.