रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) शिरुर तालुक्यातील वाघाळे गावात माजी सरपंच पप्पु भोसले यांच्या घराजवळ काल (दि ११) रोजी बिबटया दिसल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावला अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.
चासकमानच्या पाण्यामुळे वाघाळे गावातील अनेक एकर जमीन ओलिताखाली आली असुन गावात ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याच ऊस पिकात बिबटया आसरा घेत असुन रात्रीच्या वेळेस शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना भिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर या बिबटयाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
शिरुर तालुक्यात जेवणाच्या बिलावरुन तरुणावर लोखंडी खुर्चीने हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
शिरुर तालुक्यात शेतीच्या वादातुन तिघांना मारहाण; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
शिरुर; लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार ; पीडित तरुणीची रांजणगाव पोलिसांकडे तक्रार