Video; घोडगंगा कारखान्याच्या थकीत पगारासाठी कामगारांचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिंदोडी (तेजस फडके) घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा 15 महिन्याचा पगार थकल्याने तीन कामगार घोडगंगा कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर 300 फुटावर चढून अनोखे आंदोलन केले आहे. सकाळी 10 वाजल्यापासून हे कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढले होते. महेंद्र काशीद, तात्यासाहेब शेलार व संतोष तांबे हे तीन कामगार कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवर चढून बसले होते. तसेच हे कामगार कोणाचच ऐकायला तयार नव्हते. परंतु कामगार आयुक्त यांच्यासोबत बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सायंकाळी 6:30 च्या सुमारास हे कामगार खाली उतरले.

या कामगारांनी खाली उतरावे यासाठी घोडगंगाचे कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे, शिरुर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, भाजपचे जिल्ह्याचे नेते राजेंद्र कोरेकर, भारतीय जनता पार्टी किसन मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य सुभाष कांडगे, श्रीनिवास घाडगे, एकनाथ शेलार, राजेंद्र गारगोटे, शिरुरचे उपविभाग अधिकारी प्रशांत ढोले, शिरुर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, त्यांचे सर्व सहकारी, अग्निशामक दलाचे जवान व सर्व कामगार या ठिकाणी थांबून त्यांना खाली येण्याची विनंती करत होते. परंतु हे तीनही कामगार ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते.

 

परंतु घोडगंगाचे कारखान्याचे विद्यमान संचालक दादा पाटील फराटे, शिरुर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रविंद्र काळे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, भाजपचे जिल्ह्याचे नेते राजेंद्र कोरेकर या सर्वांनी या कामगारांची समजुत काढत कामगार आयुक्तांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे तीनही कामगार सायंकाळी 6:30 च्या सुमारास कारखान्याच्या धुराड्याच्या चिमणीवरुन खाली उतरले. त्यामुळे उपस्थित सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

शिरुर तालुक्यात बंदूकिचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन जीवघेणा हल्ला

शिक्रापुर पोलिस स्टेशनचे API केशव वाबळे यांनी महाराष्ट्राला मिळवून दिले सुवर्णपदक