मांडवगण फराटा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे रविवार (दि 18) रोजी येथील माऊली मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड  जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी मराठा समाजाच्या विविध सद्यस्थितीतल्या समस्यांवरती भाष्य करत युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच आपले रोजगार बाहेर कसे जातात आपण कशा पद्धतीने स्किल डेव्हलप करणे गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले.

तसेच काळानुसार विवाह पद्धती खर्चिक गोष्टी आणि समाजातील अनिष्ट परंपरा एकविसाव्या शतकात आपण कशा पद्धतीने बदलल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. मराठा समाज कोणत्या दिशेने चालला आहे. पुढच्या पंचवीस वर्षातील समाजाचे चित्र काय असेल आणि इतर समाजाच्या तुलनेत आपण कुठे असु याविषयी गुलाब गायकवाड यांनी सखोल मार्गदर्शन केले.

मराठा समाजातील युवक सुशिक्षित रोजगार आणि ग्लोबलायझेशनच्या युगात आपण लाईट येण्याची वाट न बघता इंटरनेटची कास धरली पाहिजे. याबाबतही भास्कर पुंडे व गुलाब गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाबाराजे पवार, लक्ष्मण फराटे, सर्पमित्र सुनील कळसकर, शेखर फराटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संतोष फराटे, परशुराम मचाले, चेतन मचाले व मान्यवर उपस्थित होते.