रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) शिरुर तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल घेऊन कारेगाव येथील माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुलच्या प्रिन्सिपल तसेच पत्रकार कांचन सोनवणे पाटील यांची युवा क्रांती फाउंडेशन अंतर्गत पोलीस मित्र व ग्राहक, पत्रकार आणि माहिती अधिकार संघटनेच्या पुणे जिल्हा मिडिया प्रमुख पदावर नियुक्ती करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या पुणे जिल्हा कायदा सल्लागार व सामाजिक कार्यकर्त्या मिना गवारे यांनी दिली.
पोलिस मित्र संघटनेच्या पुणे जिल्हा कायदा सल्लागार मिना गवारे तसेच शिरुर तालुका उपाध्यक्ष अश्विनी जाधव यांनी कांचन सोनवणे पाटील यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र प्रदान केले. तसेच संघटनेच्या एकंदरीत कामाबद्दल माहिती दिली. संपुर्ण महाराष्ट्रात संघटनेचे काम कशा प्रकारे चालते. संघटनेतील पोलीस मित्र, ग्राहक व पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार या चार अधिकारांचा योग्य पद्धतीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन केले.
या संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र सूर्यवंशी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रंगनाथ मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष जयश्री अहिरे, जिल्हाध्यक्ष सुदाम रणदिवे आणि संघटनेच्या कार्यकारिणी मंडळातील सर्वच पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने युवा क्रांती फाउंडेशन मार्फत सर्वोत्तम सामाजिक कार्य करण्यात सातत्याने अग्रेसर राहुन ग्रामीण भागातील तळा-गाळातील गरीब गरजू महिलांना सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचा निरंतर प्रयत्न करण्याचा प्रामाणिक हेतु असल्याचे मत आपल्या निवडीनंतर कांचन सोनवणे पाटील यांनी व्यक्त केले.
तसेच संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या आजवर केलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक कामाची योग्य दखल घेऊन पुणे जिल्हास्तरावर मिडिया प्रमुखपदी काम करण्याची संधी देऊन विश्वास दाखविल्याबद्दल सोनवणे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.