शिरूर तालुक्यातील एकवीस बालवैज्ञानिकांची अवकाशात भरारी

शिरूर तालुका

शिरुरच्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये झाली नव्याने नोंद

शिक्रापूर (शेरखान शेख): डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप अन्वये सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ हे यशस्वीपणे पार पडले असून त्यामध्ये शिरुर तालुक्यातील तब्बल एकवीस बालवैज्ञानिकांनी कामगिरी बजावली असून त्या बाल वैज्ञानिकांची पाच रेकॉर्ड मध्ये याची नोंद झाली आहे.

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम फाउंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप अन्वये सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन २०२३ हे संपन्न झाले असून डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम लाँच व्हेईकल लॉईकल मिशन २०२३ मध्ये सहभागी होण्यासाठी भारतातून ५००० विद्यार्थी तर महाराष्ट्रातील ५३० विद्यार्थी तर पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील सोहम पंडित, ऋतुराज तराळकर, प्रेमसाई सातपुते, ऋतुजा शेजवळ, वैभवी सातपुते, आयुष जाधव, तन्मय ढवळे, रूद्र आल्हाट, चैतन्य गोरे, संस्कृती शेलार, श्रेया प्रभुणे, आर्यन बर्डे, शार्दूल पडवळ, भक्ती शेलार, सृष्टी मुंडे, श्रावणी ठोंबरे, आकाश लोखंडे, गणेश कदम, सागर घाडगे, सई काळे, वरद मोटे या एकवीस बाल वैज्ञानिकांनी सहभाग नोंदविला होता, तर या बाल वैज्ञानिकांना मिलिंद चौधरी, राज्य समन्वयक मनीषा चौधरी, माधुरी शेजवळ, दिपाली पडवळ, मनिषा शेरकर, नंदा सातपुते यांचे मार्गदर्श लाभले.

सदर विद्यार्थ्यांपैकी भारत मेरिट मध्ये आलेले वैभवी सातपुते, आयुष जाधव, ऋतुजा शेजवळ यांना स्पेस झोन इंडिया चेन्नई येथे हे रॉकेट बनविण्याची संधी मिळाली, त्यांनतर भारतातील मुलांसाठी पट्टीपुरामला रॉकेटची कार्यशाळा झाली व सदर रॉकेट १५० उपग्रहांसह अवकाशात सोडण्यात आले असून AKSLV असे या रॉकेटचे नाव आहे. मिशन २०२३ चे हे उपग्रह अवकाशात नेण्यासाठी वापरलेले रॉकेट भारतीय बनावटीचे असून यामध्ये दोन प्रकारचे इंधन वापरले आहे असून संपूर्णपणे भारतीय विद्यार्थ्यांची हि मिशन होती.

अवकाश संशोधना संबधी विद्यार्थ्यांना चालना देणारी सदर मोहीम डॉ. आनंद मॉलिगंम या २९ वर्षाच्या तरुण वैज्ञानिक संचलनात पार पडली तर शिरुर तालुक्यातील बाल वैज्ञानिकांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच ए के आय एफ बुक ऑफ रेकॉर्ड अशा पाच रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

संपूर्ण जगात सर्व उपग्रह आपले कार्य करून जमिनीवरील केंद्राशी संपर्क करून वातावरणातील विविध माहिती पाठवू लागलेत. ३७९ सेकंद नंतर रॉकेट मधील इंधन संपले आणि रॉकेटने १५० उपग्रह अवकाशांत सोडले. सर्व उपग्रह अवकाशातील सब ऑर्बिट मध्ये तरंगू लागले. त्याचवेळी रॉकेट चे आतील भागात असलेला पॅराशूट सुद्धा उघडला गेला आणि त्याचे साहायाने रॉकेट चा परतीचा प्रवास सुरु झाला. प्रक्षेपण स्थळ पासून ६.५ कमी अंतरवर रॉकेट समुद्रात उतरले. जिपीएसच्या सहाय्याने रॉकेट कुठे उतरलेय याची माहिती मिळाल्याने कोस्ट गार्डसच्या मदतीने रॉकेट परत हस्तगत करण्यात आले.