शिक्रापूर पोलिसांकडून कारसह पाचशे किलो गोमांस जप्त

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन कार मधून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या कारवर शिक्रापूर पोलीस व गोरक्षकांच्या पथकाने कारवाई करत कार सह गोमांस जप्त केले असून कार चालक पळून गेल्याने अज्ञात व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पुणे नगर महामार्गावरून एक काळ्या काचांची कार अहमदनगर बाजूने गोमांस घेऊन येत असल्याची माहिती मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती देत मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, पोलीस शिपाई अंकुश चौधरी, भास्कर बुधवंत, गोरक्षक प्रतिक भेगडे, तुळशीराम सातपुते यांसह आदींनी शिक्रापूर चौकट सापळा लावत अहमदनगर बाजूने आलेल्या सदर संशयित कार चालकाला थांबण्याची विनंती केली असता कार चालक चाकण बाजूने पळून गेला.

दरम्यान पोलिसांसह गोरक्षकांनी कार चालकाचा पाठलाग केल्याने त्याने सदर कार पिंपळे जगताप गावच्या कमान समोर उभी करुन पोबारा केला. दरम्यान पोलिसांनी एम एच ०४ ई टी ०९८० या कारसह गोमांस जप्त केले. सदर घटनेबाबत पोलीस शिपाई अंकुश महादेव चौधरी रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.