पारनेरमधील युवकांचा शिरुरमध्ये दिवसाढवळ्या राडा…

मुख्य बातम्या शिरूर तालुका

जुन्या वादातून रामलिंग येथिल युवकाला बेदम मारहाण

शिरुर (अरुणकुमार मोटे): जुन्या वादातून शिरुरच्या रामलिंग परीसरात राहणाऱ्या युवकाला पारनेर तालुक्यातील ४ जणांनी शिरुर शहरातील एका हॉटेलसमोर येऊन जबर मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत शिरुर पोलीस स्टेशन येथे विजय घोलप, तुषार घोलप, दत्ता घोलप, संकेत रासकर व दाद्या रासकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर पोलिस स्टेशन हद्दीत पुर्णपणे कायदा सुव्यवस्था धोक्यात आली असून खुन, जबरी चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दुचाकी गाडीच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

शिरुर जवळील रामलिंग येथे राहणाऱ्या राहुल धरणे आणि विजय घोलप यांचे काही दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. १३ जून रोजी राहुल धरणे हा शहरातील ऑक्सिगोल्ड हॉटेलमध्ये आलेला असताना विजय घोलप हा काही साथीदारांसह तिथे आला. त्याने हॉटेलच्या पार्किंग मध्ये राडा घालत जुन्या वादातून राहुल यास शिवीगाळ, दमदाटी करत लाकडी दांडक्यासह हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, सदर मारहाणीमध्ये राहुल धरणे जखमी झाला आहे.

याबाबत राहुल बबन धरणे (वय २५ वर्षे) रा. रामलिंग तुकाईमळा (ता. शिरुर, जि. पुणे) याने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असुन शिरुर पोलिसांनी विजय घोलप, तुषार घोलप, दत्ता घोलप तिघे रा. आळकुटी (ता. पारनेर, जि. अहमदनगर) संकेत रासकर, दाद्या रासकर दोघे (रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस नाईक विनोद मोरे हे करत आहे.