Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी फिर्यादी व्हावे नागरिकांची मागणी

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर रामलिंग येथील 33 वर्षीय अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणी दहा दिवस उलटले असुन सुसाईड नोट पोलिसांकडे असताना तिच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आणि सुसाईड नोट मध्ये उल्लेख असणाऱ्या रांजणगाव MIDC तील संबंधित बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल झालेला नाही. याबाबत शिरुर पोलीसांनी अंजली गायकवाड यांचे आई-वडिल पुढे आल्यास आम्ही गुन्हा दाखल करण्यास तयार आहोत अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणात जर कोणीही पुढे येत नसेल तर सरकार तर्फे शिरुर पोलिस फिर्यादी का होत नाहीत…? असा प्रश्न विचारला जात आहे.

शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अनेकवेळा दारु, जुगार, मटका यावर कारवाई केली जाते त्यात स्वतः पोलिस फिर्यादी होत असतात. तसेच अनेक गुन्ह्यात कोणीच फिर्याद द्यायला पुढे आले नाही तर सरकार तर्फे स्वतः पोलिसच फिर्याद देतात. मग अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणात दहा दिवस उलटूनही पोलिस सरकार तर्फे फिर्यादी होऊन गुन्हा का दाखल करत नाहीत…? अशी शिरुर तालुक्यात दबक्या आवाजात चर्चा सुरु असुन अंजलीला खरंच न्याय मिळणार का…? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.

तर अशी चुकीची प्रवृत्ती वाढत जाईल…?

अंजली गायकवाड यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहिलेल्या सहा पानी सुसाईड नोट मध्ये त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या रांजणगाव MIDC येथील बांधकाम व्यावसायिकाने लग्नाचे पुरावे कसे गोड बोलुन हस्तगत केले आणि जाळून टाकले. तसेच किती मानसिक त्रास दिला. याचा उल्लेख केलेला असुन या बांधकाम व्यावसायिकामुळेच त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे स्पष्ट लिहिलेले असतानाही अजुनही गुन्हा दाखल होत नसल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिक मोकाट आहे. परंतु त्याच्यावर कारवाई न झाल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल आणि अशी चुकीची वृत्ती फोफावत जाईल असेही काही जानकारांचे म्हणने आहे.

कानून के लंबे हात अखड क्यूँ गये…?

आपण अनेक हिंदी सिनेमात “कानून के हात लंबे होते है” अशा प्रकारचा डायलॉग सतत ऐकत असतो. परंतु अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणात मात्र “कानून के हात लंबे नहीं बंधे होते है” असाच प्रत्यय येत असुन शिरुरचे उपविभागीय अधिकारी यशवंत गवारी आणि पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरणात पत्रकारांना वारंवार आम्ही फिर्याद घेण्यास तयार आहोत. परंतु अंजलीचे आई-वडील पुढे येत नाहीत असच उत्तर दिलं. परंतु या प्रकरणात सरकार तर्फे पोलिसच का फिर्यादी होत नाहीत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. त्यामुळे “कानून के लंबे हात किसी वजह से अखड तो नंही गये ना” अशी दबक्या आवाजात शिरुरमध्ये चर्चा सुरु आहे.