शिक्रापुरात कुत्र्याच्या तावडीतून कोल्ह्याची सुटका

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरात असलेल्या शिक्षक कॉलनी येथे एक कोल्हा रस्ता कुत्र्याच्या तावडीत अडकलेला असताना सदर कोल्ह्याला कुत्र्याच्या तावडीतून मुक्त करत जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्षक कॉलनी येथे रस्ता चुकलेल्या एका कोल्ह्यावर काही कुत्रे हल्ला करत असल्याचे अभय आढाव या युवकास दिसले. त्यांनी तातडीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर शेरखान शेख यांनी त्यांचे सहकारी अमोल पवार, सुनील पवार, राहुल पवार, अभय आढाव यांच्या मदतीने सदर कोल्ह्याला शिताफीने ताब्यात घेतले. याबाबतची माहिती शिरुर वनविभागाचे वनपाल प्रवीण क्षिरसागर, वनरक्षक बबन दहातोंडे यांना देत कोल्ह्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वतीने प्राथमिक उपचार करुन कोल्ह्याला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे.

यावेळी बोलताना मनुष्यवस्तीत कोणताही कोणताही वन्य प्राणी, पक्षी आढळून आल्यास नागरिकांनी तातडीने वनविभाग व प्रनिमित्रांना कळवण्याचे आवाहन तातडीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे.