शिरुर तालुक्यातील वाळू लिलावाच्या धोरणामध्ये बदल करण्याची शिवसेनेची मागणी

शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील निमोणे व चिंचणी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून वाळू लिलाव झालेला असुन सहाशे रुपये ब्रास या प्रमाणे सर्व सामान्यांना वाळू पुरवण्याचे अमिष शासनाने दाखवले आहे. परंतु शिरुर तालुक्यातील शासनाच्या वाळू लिलावाच्या चुकीच्या धोरणामुळे शासनाने या वाळू लिलावा संदर्भातल्या धोरणामध्ये सुधारणा करुन लिलाव चालू करावेत अशी मागणी शिवसेना (उद्धव ठाकरे गटाचे) उपतालुकाप्रमुख अनिल पवार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भात शिरुरचे तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शेतकरी सेनेचे योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार संतोष काळे हे उपस्थित होते .

 

महाराष्ट्र शासनाने वाळू खरेदीसाठी ऑनलाईन प्रणालीव्दारे नोंदणी करण्याचे अवाहन करुन स्वस्तात वाळू पोहोच करु असे सांगितल्यामुळे अनेकजण ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु प्रत्यक्षात ऑनलाईन प्रणालीच ठप्प आहे, नोंदणी पण होत नाही. त्यामुळे सदरचे शासनाचे वाळू संदर्भातले धोरण फेल झालेले दिसून येत आहे आणि आत्तापर्यंत प्रत्यक्षात कोणालाच संपूर्ण महाराष्ट्रात सहाशे रुपयात वाळू मिळालेली नाही आणि भविष्यात मिळण्याचीही सुतराम शक्यता नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

 

तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वस्त वाळू देण्याचे शासनाचे धोरण प्रत्यक्षात मात्र पुर्णतः फेल झालेले आहे. वाळू लिलावामध्ये नदीपात्रामधून आधुनिक वाळू यंत्रांच्या व मजुरांच्या सहाय्याने काढण्यासाठी येणारा खर्च तसेच वाळू डेपोचा खर्च यानंतर डेपोपासून प्रत्यक्षात ज्याला वाळू हवी आहे त्याच्या घरापर्यंतचा वाहतुक खर्च पाहिला तर खर्च चार ते पाच हजारांच्या पुढे जात असून लोकांना वाळू महाग पडत आहे. यामध्ये वाळू लिलाव घेतलेल्या शासकीय ठेकेदाराची मनमानी पद्धत दिसून येते.

 

त्यामुळे शासनाने या वाळूच्या धोरणामध्ये सुधारणा करण्यात यावी. जेणेकरुन सर्वसामान्यांना वाळू माफक दरात मिळेल. या अगोदर शासन ज्यावेळी वाळू लिलाव करत होते त्या वेळी पारदर्शक आणि सोपी पद्धत होती. वाळू खरेदी केल्यानंतर वाहनास शासकीय पावती दिली जात होती. या जुन्या पद्धतीचा जरी अवलंब केला तरी स्थानिक ठिकाणी वाळू लिलाव ठेकेदार व स्थानिक ग्रामस्थ यांचा वाद होणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे.

शिरुर तालुक्यात वाळूच्या पैशाच्या वादातुन दोन ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी

शिरुर तालुक्यात कुऱ्हाडवाडी येथे महसुल विभागाच्या नाकावर टिच्चून रात्री बेकायदेशीर वाळू उपसा

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली लाखों रुपयांची वाळूचोरी

शिरुर तालुक्यात वाळू डेपोच्या नावाखाली सर्रास वाळूचोरी; रात्रीच्या वेळेस चोरट्या मार्गाने होतेय वाळूची वाहतुक