gayatri-ingle-shikrapur

शिरूर ! पुणे-नगर महामार्गावरील कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले…

क्राईम शिरूर तालुका

तळेगाव ढमढेरे (ओमकार भोरडे) : शिरूर तालुक्यातील कोंढापुरी गावच्या हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गावर कासारी फाटा येथे कंटेनरने युवतीला चिरडले आहे. मंगळवारी (ता. १) साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असून, युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

गायत्री गजानन इंगळे (रा. शिक्रापूर, वय २२) असे मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे. युवती आपल्या अॅक्टीव्हा (एम.एच. १२ आर.इ. ४२९९) वरून कुरीयर घेण्यासाठी कासारी फाटा येथे गेली होती. रस्ता क्रॉस करण्यासाठी ती डिव्हायडरदरम्यान थांबलेली असताना कंटेनरने (एम.एच. ४६ बी.एफ. ९२४०) तिच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या गायत्रीला तातडीने ग्रामीण रुग्णालय, शिक्रापूर येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले.

अपघात करणाऱ्या कंटेनरचा चालक राजन कुमार गौतम (रा. कुंदवा उर्फ दिलीपनगर, कसया, कुशीनगर, उत्तर प्रदेश) याने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निष्काळजीपणे वाहन चालवले असल्याचे फिर्यादी गौतम श्रीराम इंगळे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेचा पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर शहर व तालुक्यात बेकायदा गतीरोधकांचा हैदोस; अपघातांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये संताप

Video: शिरूर तालुक्यात भीषण अपघातात आईचा जागीच मृत्यू, दोन चिमुकले जखमी…

शिरूर येथे भीषण अपघात; डंपरच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू