शिरूर (अरुणकुमार मोटे): काठापूर (ता. शिरूर) येथे अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाच्या थिटे सीमा बिपीन यांनी विजय मिळवला असून थेट जनतेतून त्यांची सरपंचपदी वर्णी लागली आहे. काठापूरमध्ये यापुर्वी सरपंच असलेले बिपीन थिटे यांनी विकासकामांच्या माध्यमातून काठापूर गावचा विकास केला असून, पत्नीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीवर पुन्हा सत्ता प्रस्थापीत केली आहे.
सोने सांगवी येथे अतिशय प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीत गड गेला पण सिंह आला अशी अवस्था झाली आहे. रेखा मल्हारी काळे यांची जनतेतून थेट सरपंचपदी वर्णी लागली असून त्यांचे ३ उमेदवार निवडून आले असून, विरोधी गटाचे ६ उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे कभी खुशी कभी गम अशी अवस्था झाल्याचे चित्र सोने सांगवीमध्ये दिसत आहे.
मांडवगण फराटा येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दादा पाटील फराटे यांच्या पॅनेलने सरपंचपद व ११-६ ने दणदणीत विजय संपादिप केला असून, त्यांची सुन समीक्षा कुरुमकर यांची थेट जनतेतून सरपंचपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी पक्षाला या निवडणुकीत सपशेल हार मानावी लागली असून, आमदार अशोक पवार यांना यामुळे मोठा धक्का मानला जात आहे.
मांडवगण फराटा ग्रामपंचायतमध्ये कमळ फुलले, घड्याळाची टिकटिक मात्र बंद