shirur god photo

नागरीकांनी घाण करू नये म्हणून होतोय चक्क देवांच्या फोटोंचा वापर…

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये महानगर बँकेमध्ये जीना चढताना कोपऱ्यात कुणी थुंकु नये म्हणून नामी शक्कल लढवत पायालगत देवदेवतांचे फोटो लावले आहेत. तसेच बाबूराव नगरमधील मोकळ्या जागेत नागरीकांनी घाण, कचरा टाकू नये म्हणून जागा मालकांनी वेगवेगळया ठिकाणी देवदेवतांचे फोटो लावलेले आहे.

सदर ठिकाणी लावण्यात आलेले हिंदू धर्मातील देवदेवतांच्या फोटोमुळे हिंदू धर्माच्या देवांची विटंबना होत असून ही बाब अत्यंत लज्जास्पद आहे. वास्तविक पाहता हिंदु धर्मामध्ये आपण आपल्या देव-देवतांचे स्थान हे पवित्र अशा मंदिरामध्ये असते. परंतु, अशा विचित्र ठिकाणी देवांचे फोटो लावून जाणीवपूर्वक त्यांचा अपमान केल्या सारखे आहे. सदर ठिकाणी हिंदू धर्मातील देव देवतांची अशा प्रकारची विटंबना थांबवून त्वरीत ते फोटो काढण्याची मागणी विश्व हिंदू परीषद बजरंग दल शिरूर प्रखंड यांनी केली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

पाच दिवसामध्ये हिंदू धर्माचा पवित्र असा श्रावणमास चालू होत आहे. त्यामुळे बँका, हॉटेल्स, मोकळ्या जागा, रस्त्यालगत असणारे फिरते आयुर्वेदीक औषधालय यांनी असे चुकीच्या ठिकाणी असणारे देवदेवतांचे प्रतिकात्मक फोटो त्वरीत काढून टाकावेत, यासाठी बजरंग दल शिरूर यांनी महानगर बॅक यांना लेखी निवेदन दिले आहे.