Popatrao Dhumal

पिंपळे धुमाळ येथील स्वातंत्र्य सैनिकाला कुटुंबियांनी दिले वाढदिवसाचे सरप्राईज!

शिरूर तालुका

शिक्रापूर (तेजस फडके): पिंपळे धुमाळ येथील स्वातंत्र सैनिक पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांना ७१व्या वाढदिवसानिमित्त कुटुंबियांनी सरप्राईज दिल्यामुळे ते भाराऊन गेले होते. कुटुंबिय आणि नातेवाईंकांनी एकत्रित मिळून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला. शिवाय, वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला. शिवाय, शिंदे सरकारने निवृत्तीवेतनात वाढ केल्यामुळे सरकारचेही आभार मानले.

स्वातंत्र सैनिक पोपटराव विठ्ठलराव धुमाळ यांना 1976 साली आणीबाणीच्या काळात येरवडा जेलमध्ये एक महिन्याचा कारावास भोगावा लागला होता. शिवाय, ते ७१व्या वर्षात पदार्पण करणार होते. घरातील सर्व परिवाराने औचित्य साधून त्यांना सरप्राईज देण्याचे ठरवले. पण, त्यांना याची काही कल्पना होऊ न देता. सर्वजण नियोजणाच्या तयारीला लागले होते. सोमवारचा (ता. २१) दिवस उगवला आणि त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. कुटुंबिय, नातेवाईक आणि ग्रामस्थ हळूहळू गोळा होऊ लागले आणि वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पोपटराव धुमाळ यांना त्यांच्या पत्नी विजया यांनी 71 दिव्यांनी औक्षण केले.

कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन पोपटराव धुमाळ यांचे मुलगे नवनाथ आणि दत्तात्रय, सुना आशा आणि वृषाली. मुलगी अलका सुभाष दौंडकर (रा. करंजावणे), निशा संपत शेळके (रा. कडूस, तालुका खेड) यांनी पुढाकार घेऊन वडिलांचा ७१वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. बाळासाहेब बबनराव धुमाळ, माणिक बबनराव धुमाळ, रघुनाथ गुलाबराव धुमाळ, सायली अमोल काळे, अभिषेक नवनाथ धुमाळ, ऋषिकेश दत्तात्रय धुमाळ, समीक्षा दत्तात्रय धुमाळ, अक्षरा अक्षय ढमढेरे, साक्षी, समीर, जयंत, सुरज, सुभाष दौंडकर, सिद्धार्थ संपत शेळके, जिजा अमोल काळे, तनुष अमोल काळे या नातवंडांनी आणि पतवंडांनी हार तुरे सजावटीचे काम पार पाडले. सर्व परिवाराने आणि ग्रामस्थांनी तसेच नातेवाईकांनी शिंदे सरकारचे आभार मानले.

या कौतुक सोहळ्यासाठी स्वातंत्र्य सेनानी संपत वामनराव धुमाळ, शरद बाबुराव धुमाळ, कैलास यशवंत धुमाळ, किशोर शामराव धुमाळ, उपसरपंच राजेंद्र विठ्ठल धुमाळ, पंचायत समिती शिरूरचे सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच अश्विनी धुमाळ, चेअरमन संभाजी शंकर धुमाळ, दिलिप धुमाळ, शिरूर केसरी विशाल धुमाळ, माजी सरपंच रमेश साहेबराव धुमाळ, बाबासाहेब शिंदे, हर्षद जाधव, जिल्हाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी शिरूर लोकसभा, कृषी उत्पन्न बजारसमितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर शेळके, माऊली शेळके, तेजू पलांडे, महेश गुलाबराव धुमाळ, मकरंद मल्हारराव धुमाळ, दत्तात्रय नारायण धुमाळ, महेश चंद्रकांत धुमाळ, किरण अशोक धुमाळ, ज्ञानेश्वर वसंत धुमाळ, डॉक्टर संभाजी शेळके, बाळकृष्ण शेळके, राजेंद्र शेळके, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरूर कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके, अध्यक्षा दीपाली शेळके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा…
२५ जून 1975 साली पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशावर आणीबाणी टाकली. देशात आणीबाणी टाकल्यावर चळवळ सुरू झाली. चळवळ झाल्यावर अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, लाल कृष्ण आडवाणी यांनी सत्याग्रह चालू केले. शिरूर तालुक्यातील कंरजावणे येथील कैलासवासी बाबुराव दौंडकर यांनीही सत्याग्रह करण्याचे ठरवले. करंजावणे गावातून बारा, पिंपळे धुमाळ गावातून चार, कोरेगाव भीमातून तीन, राऊतवाडीतून बारा आणि शिरूर मधून एक जण एकत्र आलो. तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सर्वांनी मिळून सत्याग्रह केला. सत्याग्रह केल्यावर आम्हा सर्वांना येरावडा या ठिकाणी एक महिन्याची शिक्षा दिली. तो दिवस म्हणजे 24 नोव्हेंबर 1976. जेलमध्ये असताना जेवणाची खूप हाल भोगले लागले. 52 पत्त्याची भाजी खाऊन जीवन जगलो. कपड्यांना उवा झाल्या होत्या. मी एक महिन्याची शिक्षा भोगली. पण बाबुराव दौंडकर यांना मिसा कायद्याखाली नाशिक या ठिकाणी 13 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली.

दरम्यान, स्वातंत्र सैनिक पोपटराव विठ्ठलराव धुमाळ हे आठवणींना उजाळा देताना जुन्या आठवणीत रमले होते. उपस्थित सर्वजण शांतपणे ऐकत होते. यावेळी त्यांनी कथन केलेले अनुभव ऐकून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला. पण, काही वेळातच पुन्हा वातावरण बदलले आणि वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. जय हिंद, जय महाराष्ट्र! म्हणून शिंदे-फडणवीस सरकारचे निवृत्तीवेतनात वाढ केल्यामुळे त्यांनी आभार मानले.