आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी असा शालेय मित्रांचा अनोखा उपक्रम

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): दिवाळी सन सर्वात महत्वाचा सन सर्व नागरिक आनंदाने दिवाळी साजरी करतात मग गरिबांचे काय या हेतूने काही शालेय मित्रांनी एकत्रित येत आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी हा उपक्रम, राबवून परिसरातील तब्बल 100 गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दहावीचे जुने मित्र एकत्रित आले यावेळी आपण दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी करतो मात्र गरिबांना ते शक्य नाही त्यामुळे आपण या दिवाळीला काही गरीब कुटुंबाना फराळ वाटप करुन त्यांचीही दिवाळी गोड करु, असा निर्णय घेतला त्यांनतर उपसरपंच मयूर करंजे, जितेंद्र जोशी, प्रीतम शिर्के, जालिंदर वाबळे, प्रशांत उबाळे, राजेंद्र गायकवाड, सचिन खेडकर, राजेंद्र खरपुडे, अविनाश कदम, सुभाष गायकवाड, विनोद काळे, गणेश काळकुटे, दत्तात्रय संभाजी मांढरे यांनी योगदान देत पैसे गोळा करुन गोळा झालेल्या पैशातून दिवाळी फराळ व मिठाई खरेदी करुन परिसरातील गरीब व गरजू कुटुंबांना वाटप सुरु केले आहे.

सदर उपक्रमातून समाजातील सुशिक्षित चांगल्या विचारांची लोकं एकत्र आली तर एक विधायक काम उभं राहतं याचा वस्तुपाठच हे मित्र देत आहेत. पाहिलीपासून जमलेली यांची गट्टी आज अशा पद्धतीने एका चांगल्या कामात देखील कायम असल्याने सदर युवकांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे, तर पुढील दिवाळी मध्ये दोनशेपेक्षा अधिक लोकांचं तोंड गोड करण्याचा आम्ही संकल्प केला असल्याचे सर शालेय मित्रांनी सांगितले.