shirur-river

शिरूर नगरपरिषदेच्या वतीने नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन साजरा!

शिरूर तालुका

शिरूर (अरुणकुमार मोटे): स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 4.0 अंतर्गत शिरूर नगरपरिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (गुरुवार) ‘नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन” साजरा करण्यात आला.

‘नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन” या दिनानिमित्त शहरातील विसर्जन घाट येथे लोक सहभागातून घोडनदी पात्राची स्वच्छता करण्यात आली. प्रशासक तथा मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी नागरिकांना आपल्या नद्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांबद्दल एकमेकांना शिक्षित करण्याचा आणि त्यावर उपाय शोधण्याचा हा दिवस असून नदीपात्रात कचरा न टाकण्याचे आवाहन केले.

या स्वच्छता मोहिमेत शिरूर नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, स्वच्छता व पाणी पुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी, माजी नगरसेवक तसेच सामाजिक कार्यकर्ते संदीप गायकवाड, पत्रकार सतीश धुमाळ, शिरूर नगरपरिषद शाळा क्र. ०१ चे शिक्षक व विद्यार्थी, शहरातील बचत गट महिला यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.

शिरुर तालुक्यात गुटका, मटका आणि इतर अवैध व्यवसाय जोमात; पोलिस मात्र कोमात

रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) पर्यंत मेट्रो; वाहतूक कोंडी सुटणार…

‘लंडन’ च्या पाहुण्यांनी घेतला ‘हॉटेल संदीप’ च्या जेवणाचा आस्वाद

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…