कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही; प्रमोद क्षिरसागर

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे ग्रामीण मध्ये औदयोगिक वसाहतीमध्ये कंपन्यांना धमकावणाऱ्या तसेच कंपन्यांना त्रास देणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेले असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कंपन्यांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी सांगितले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये औदयोगिक वसाहतीमध्ये अनेक कंपन्या असून यापूर्वी अनेकदा कंपन्यांकडून ठेके मिळवण्यासाठी कंपन्यांना त्रास देण्याच्या घटना घडलेल्या आहेत. औदयोगिक वसाहतीमध्ये माथाडी, लेबर, स्क्रॅप, पाणी सप्लाय, कॅन्टीन, ट्रान्सपोर्ट यांसह आदी ठेके मिळविण्यासाठी तसेच आर्थीक बाबींसाठी कंपन्यांना खंडणी मागून कंपन्यांना धमकावणाऱ्या तसेच दबाव आणणाऱ्या व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिले असल्याने कारवाई दरम्यान आवश्यकते नुसार मोक्का अर्थात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असून शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही औदयोगिक वसाहतीमधील सर्व उदयोजक, कंपनी व्यवस्थापक तसेच अधिकारी यांना कोणी अशा पद्धतीने त्रास देत असले तर त्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता शिक्रापूर पोलिसांशी ०२१३७२८६३३३ किंवा ९०७७१००१०० या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा पोलीस स्टेशनला येऊन तक्रार द्यावी गरज भासल्यास कंपन्यांना संरक्षण देखील देण्यात येईल, असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी केले आहे.