शिरुर तालुक्यात उभ्या कारने घेतला पेट

महाराष्ट्र शिरूर तालुका

कार खाक तर आग विझवण्यासाठी उपसरपंचांची धडपड

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथे रस्त्याचे कडेला लावलेल्या कारने अचानक मोठा पेट घेतल्याने कार जळून खाक झाली असून कोणतीही हानी न होता दोन माजी उपसरपंचांच्या सतर्कतेने अनर्थ टळला आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील शेळ्यांच्या आठवडे बाजारात आज सकाळच्या सुमारास तुळापुर येथील मनोज कनीचे हे त्यांच्या ताब्यातील एम एच १२ यु एस ५६४८ हि कार घेऊन आले होते. कार रस्त्याचे कडेला लाऊन मनोज हे शेळ्यांच्या बाजारात गेले असता कारने अचानक मोठा पेट घेतला. मात्र कार शेजारीच गॅसचे दुकान असल्याने असल्याने खळबळ उडाली.

दरम्यान येथे उपस्थित असलेले माजी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, नवनाथ ढमढेरे यांनी समोरील सावता माळी मंगल कार्यालयातून पाण्याचा पाईप चालू करुन शर्थीचे प्रयत्न करत कारला लागलेली आग विजावली तब्बल 25 मिनिटांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यास यश आले.

सुदैवाने यावेळी कोणतीही हानी झाली नसून कार जळून खाक झाली असून घडलेल्या घटनेबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील वाहन जळाल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.