शिरुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळाली ‘पिको सॅटॅलाइट’ बनवण्याची संधी

शिरूर तालुका

२० जानेवारीला कार्यशाळा, तर १९ फेब्रुवारीला प्रक्षेपण 

शिरुर (अरुणकुमार मोटे): ‘डॉ. ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन हाऊस ऑफ कलाम रामेश्वरम्’ आयोजित आणि स्पेस झोन इंडीया, मार्टिन ग्रूप यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च वेहिकल मिशन २०२३’ साठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधील २१ विद्यार्थ्यांना ‘पिको सॅटॅलाइट’ बनवण्याची संधी मिळाली आहे. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी तामिळनाडूतील पट्टीपुरम येथून देशभरातून विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे १५० पिको सॅटॅलाइट पुन्हा वापरता येणाऱ्या रॉकेटच्या साह्याने अवकाशात सोडले जाणार आहेत. यासाठी देशभरातील 5000 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रशिक्षण घेतले आहे.

नामवंत शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली २० जानेवारी रोजी पुणे येथे एकदिवसीय विभागीय कार्यशाळेत विद्यार्थी पिको सॅटॅलाइट प्रत्यक्षरित्या बनवणार आहेत. त्यानंतर देशभरातून स्पर्धेत क्षमता सिद्ध केलेल्या 100 मुलांची निवड केली जाईल. निवड झालेले हे विद्यार्थी चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनविणार आहेत. या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड तसेच जागतिक पातळीवरील इतर पाच संस्था घेणार आहेत. अशी माहिती डॉ.एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशनचे जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी आणि फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषाताई चौधरी यांनी दिली. तसेच मराठवाडा विभाग प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी मेंबर श्रीरंग औचरमल, पुणे जिल्हा समन्वय मधुरी शेजवळ, तालुका समन्वयक दिपाली पडवळ यांनी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

विद्यार्थी सहभाग

वरद अरुणकुमार मोटे, शार्दुल पडवळ, सई काळे, भक्ती शेलार, सृष्टी मुंडे, गणेश कदम, आकाश लोखंडे, सागर घाडगे, आर्यन बर्डे, श्रावणी ठोंबरे, ऋतुराज तराळकर, रुद्र आल्हाट, प्रेमसाई सातपुते, चैतन्य गोरे, सोहम पंडित, तन्मय ढवळे, संस्कृती शेलार, ऋतुजा शेजवळ, आयुष जाधव, श्रेया प्रभुणे, वैभवी सातपुते.

1 thought on “शिरुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना मिळाली ‘पिको सॅटॅलाइट’ बनवण्याची संधी

Comments are closed.