शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चीमनापिर मळा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चिमणापिर मळा व शेणाचा मळा येथे जिल्हा परिषद शाळे पुढे रस्त्यावर खड्डे पडल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रस्त्यावरील चिखलामुळे येथून जाणाऱ्या नागरिक व विद्यार्थ्यांचे खूप हाल होत असून काही अपघात देखील होत आहेत. तर येथील रस्त्याबाबत बोलताना ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार विनंती करुन येथील रस्त्यावर मुरुम टाकण्या मागणी केली आहे. मात्र प्रशासनाकडून याकडे लक्ष दिले जात नाही. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर मुरुम टाकला नाही, तर रस्त्यावर जेथे खड्डा तेथे झाड लावण्याचा उपक्रम हाती घ्यावा लागेल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते संतोष भुजबळ यांनी दिला आहे.