शिक्रापुरात बाबुराव पाचर्णे व विनायक मेटेंना श्रद्धांजली

शिरूर तालुका

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच मयूर करंजे, शिरुर बाजार समितीचे माजी सभापती सुभाष उमाप, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, जयश्री भुजबळ, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, विशाल खरपुडे, प्रकाश वाबळे, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे माजी संचालक बाळसाहेब चव्हाण, सुरेश थोरात, माजी उपसरपंच जयश्री दोरगे, नवनाथ सासवडे, रोहिणी गिलबिले, दत्तात्रय गिलबिले, राजाभाऊ मांढरे, सतीश वाबळे, पंढरीनाथ गायकवाड, सुरज चव्हाण, अशोक धुमाळ, तानाजी राऊत, अर्जुन शिर्के, प्रकाश सोंडे, शिर्के सर, तन्मय मांढरे, अनिल नवले, दिलीप कोठावळे, अंकुश घारे यांसह आदी उपस्थित होते.

यावेळी अनेक मान्यवरांनी माजी आमदार लोकनेते बाबुराव पाचर्णे यांचा जीवनपट नमूद करत त्यांनी केलेल्या संघर्षाची आठवण करुन देत पाचर्णे यांच्या आठवणींना उजाळा दिला. दरम्यान सर्व उपस्थितांच्या वतीने शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष राजाभाऊ मांढरे यांनी केले, तर पंढरीनाथ भुजबळ यांनी आभार मानले.