स्व. मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अंगणवाडीच्या लहान मुलांना साहित्य वाटप

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर हवेलीचे स्वर्गीय माजी आमदार बाबुराव यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शिरूर नगरपरिषदेच्या शाळांमधील अंगणवाडीच्या लहान विद्यार्थ्यांना बसण्यासाठी श्रीराम सेनेच्या वतीने खुर्च्या, चटई, टेबल आदी साहित्य वाटप करण्यात आले आहे.

शिरूर शहरातील मुंबई बाजार या अंगणवाडीच्या शाळेला ५० खुर्च्या, ४ मोठ्या चटई आणि टेबल अशा स्वरूपाच्या वस्तू श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष, मा.शहर प्रमुख सुनील जाधव यांच्या संकल्पनेतून वाटप करण्यात आल्या. यापुढेही या अंगणवाडीला अशीच भरीव मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लहान मुलांना मोठया कष्टाने घडवण्याचे काम या अंगणवाडीमधील शिक्षक करत आहे. अंगणवाडी मध्ये मुलांना रंगाची ओळख, गाणे, कविता, खेळ अभ्यास शिकवण्याचे काम या अंगणवाडीमधील 4 शिक्षका करत आहे. पाचर्णे साहेबांच्या आठवणी सदैव जाग्या राहण्यासाठी या लहान विदयार्थ्यांना सर्व भौतिक सोईसुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष सुनील दादा जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक सुनील भाऊ जठार, युवासेना शहर अधिकारी स्वप्निल अण्णा रेड्डी, मा.सरपंच जगदीश पाचर्णे, श्रीराम सेना सदस्य महेंद्र येवले, सिद्धांत चव्हाण, आकाश चौरे, सुरेश आरेवार, निलेश धावडे आदींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.